• जळगाव, महाराष्ट्र
  • +91 94234 42053
  • info@sankalpguru.in
विशाल पाटील सर
संस्थापकांचा संदेश

विशाल पाटील सर

संस्थापक – संकल्प फाऊंडेशन, जळगाव

शिक्षण क्षेत्रातील १३+ वर्षांचा अनुभव

नमस्कार!

गेल्या १३+ वर्षांपासून मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना मोठ्या शैक्षणिक संस्थांना भेटी देणे, विविध विषयांवरील परीक्षा व बक्षीस वितरण, विशेष व्याख्याने आणि करिअर मार्गदर्शन यांसारखे उपक्रम आम्ही राबवत आहोत.

कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांचे मोफत वर्ग आयोजित केले. तसेच मुली व महिलांना सॅनिटरी पॅड कमी शुल्कात उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही राबवला.

आर्थिक किंवा इतर अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, ही आमची भूमिका आहे. विद्यार्थ्यांना योग्य संधी, मार्गदर्शन आणि सहकार्य मिळावे, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

“देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.”

याच विचारातून संकल्प फाऊंडेशनतर्फे संकल्प अकॅडमीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती परीक्षा व विविध शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात.

आपला विश्वासू, विशाल पाटील सर संकल्प अकॅडमी, जळगाव